श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते नरेंद्र मोदी सर्वोच्च मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित
05-Apr-2025
Total Views | 12
कोलंबो : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते सर्वोच्च मित्र विभूषण पुरस्काराने गैरवण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील X ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. नरेंद्र मोदी या पुरस्काराचे दावेदार आहेत यात तिळमात्र शंका नाही याची अनेक कारणं आहेत. पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपती दिसानायके यांनी नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुरस्काराचे दावेदार आहेत. मला पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे की, श्रीलंकामधील सर्वोच्च आणि मानाचा मानला जाणाऱ्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.
श्रीलंकेचा सर्वोच्च मित्र सन्मान पुरस्कार २००८ पासून प्रदान करण्यात येत आहे. हा सन्मान राष्ट्राध्यक्षांना इतर देशांसी ठेवण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण संबंधासाठी देण्यात येतो. नरेंद्र मोदींना देण्यात आलेला पुरस्कार हा विशेष पुरस्कार आहे. ज्यामुळे भारत-श्रीलंकेच्या संस्कृतीला एक वेगळा आकार निर्माण होईल. दोन्ही देशांमध्ये स्थापित करण्यात आलेले मैत्रिपूर्ण संबंधामुळे या पुरस्काराचे ते पुरस्कर्ते आहेत.
नरेंद्र मोदी यांचे 'X' ट्विट
याचपार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी मिळालेला पुरस्कार हा अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिले की, "राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते 'श्रीलंका मित्र विभूषण' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माझ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हा केवळ माझा सन्मान नाहीतर हा सन्मान १.४ अब्जाधीश जनतेचा सन्मान आहे. हा सन्मान भारत आणि श्रीलंकेच्या लोकांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचे आणि ऐतिहासिक संबंधाचे प्रतीकच जणू. या सन्मानाने मी राष्ट्रपती, सरकार आणि श्रीलंकेच्या लोकांचे मनापासून आभार मानतो," असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते.
श्रीलंकाचे राष्ट्रपती दिसनायकेयच्या निमंत्रणावर नरेंद्र मोदी यांनी ४ ते ६ एप्रिलदरम्यान श्रीलंका दौऱ्यावर गेले. शुक्रवारी राजधानी कोलंबोमध्ये दाखल होत त्यांनी २०१९ नंतर ते पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी थायलंडचा दौरा पूर्ण केल्यानंतर ते कोलंबोत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बिम्सटेक शिखर संमेलनात भाग घेतला.