'हाउसफुल ५' चा धमाकेदार टीझर प्रदर्शित; १५ वर्षांच्या प्रवासानंतर मालिकेचा नवा अध्याय आता ‘किलर कॉमेडी’मध्ये पहायला मिळणार!

    30-Apr-2025   
Total Views | 17
 

the explosive teaser of housefull 5 is out. 
 
मुंबई : 'हाउसफुल' ३० एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झालेला साजिद नाडियाडवाला यांचा सिनेमा आज १५ वर्षांचा झाला. या खास प्रसंगी निर्मात्यांनी चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं  'हाउसफुल ५' चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. एका मिनिटाच्या या टीझरमध्ये सिनेमाच्या तगड्या स्टारकास्टची झलक दिसते. यात झळकणार आहेत बॉलिवूडमधील कलाकार अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितीन धीर आणि आकाशदीप साबिर.

यावेळी मात्र या हास्यस्फोटक मालिकेत एक नवा ट्विस्ट आहे  एका ‘किलर’ची एंट्री!
नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने इंस्टाग्रामवर टीझर शेअर करत लिहिलं, "१५ वर्षांपूर्वी आजच... हसवणं सुरू झालं! भारतातील सर्वात मोठी कॉमेडी फ्रँचायझी परत आली आहे तिच्या पाचव्या भागासह आणि यावेळी फक्त गोंधळ नाही, तर 'किलर कॉमेडी' सुद्धा आहे!"

या टीझरवर चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. एका चाहत्याने लिहिलं, "१००० कोटी लोडिंग..." दुसऱ्याने म्हटलं, "किलरचं मास्क ‘स्क्विड गेम’मधल्या फ्रंट मॅनसारखं वाटतंय इंटरेस्टिंग!"

तर एका फॅनने लिहिलं, "खूप वर्षांनी पुन्हा एकदा चांगला 'हाउसफुल' सिनेमा येतोय असं वाटतंय थोडं 'मर्डर मिस्ट्री' (जेनिफर अ‍ॅनिस्टनवाला) वाईब्स आहे... पण एकूणच जबरदस्त वाटतोय!" एकाने लिहिलं, "अक्षय कुमार परत आलाय कॉमेडीचा किंग बनून त्याचं प्रेझेन्स आणि एक्सप्रेशन्स जबरदस्त आहेत!"

‘हाउसफुल 5’ बद्दल थोडक्यात जाणुन घेऊयात!
हाउसफुल 5 चे दिग्दर्शन करत आहेत तरुण मंसुखानी. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन पुन्हा एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे अक्षय आणि रितेश हे पहिल्या भागापासून फ्रँचायझीचा भाग आहेत, तर अभिषेकने हाउसफुल 3 मध्ये धमाल केली होती.

साजिद नाडियाडवाला यांच्या नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 6 जून 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या मालिकेतील प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे आणि पाचव्या भागाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121