ठाकरे बंधू एकत्र येण्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
30-Apr-2025
Total Views | 37
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून यावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, आता यावर पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवार, ३० एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत शरद पवार म्हणाले की, "दोन कुटुंब एकत्र येत असतील तर आनंद आहे. परंतू, यासंबंधीचे भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही," असे ते म्हणाले.
"पहलगामवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. यामध्ये जे कुटुंबीय शहीद झाले त्यांनी या देशासाठी किंमत दिली आहे. त्यामुळे इथे धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. आज कुठल्या शक्तींचा भारतीयांवर हल्ला होत असेल तर देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावे लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी यासंबंधी जी काही उपाययोजना करत असतील त्याला आमचं पूर्ण सहकार्य आहे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत," असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.