‘उदंचन जलविद्युत प्रकल्पा’मध्ये ५७,२६० कोटींची गुंतवणूक

- महाराष्ट्राची ऊर्जानिर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल

    30-Apr-2025
Total Views | 6
 
Investment of Rs 57,260 crores in Udanchan jalvidyut Project
 
मुंबई: (Investment of Rs 57,260 crores in Udanchan jalvidyut Project) “राज्य ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. ‘उदंचन जलविद्युत प्रकल्पां’मधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जानिर्मितीसह राज्याला ऊर्जासंपन्न बनविण्यासाठी ‘उदंचन जलविद्युत प्रकल्पां’वर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
 
जलसंपदा विभाग, ‘महाजेनको’, ‘महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड’ आणि ‘अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज प्रा. लि.’ या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जानिर्मितीत अधिक सक्षम होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. “या पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामे विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि ‘महाजेनको’, ‘महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड’ व ‘अवादा ग्रुप’ यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8 हजार, 905 मेगावॅट वीजनिर्मिती, 57 हजार, 260 कोटींची गुंतवणूक आणि 9 हजार, 200 रोजगारसंधी निर्माण होणार आहेत.
 
जलसंपदा विभागासोबत नऊ साईट्ससाठी तीन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, मृदा व जलसंधारणमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.
 
‘महाजेनको’मार्फत घाटघर येथे 125 मेगावॅट, कोडाळी येथे 220 मेगावॅट, वरसगाव येथे 1 हजार, 200 मेगावॉट आणि पानशेत येथे 1 हजार, 600 मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ‘महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड’ यांच्यामार्फत मूतखेड येथे 110 मेगावॅट, निवे येथे 1 हजार, 200 मेगावॅट आणि येथे वरंढघाट येथे 800 मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर ‘अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज लि.’ यांच्यामार्फत पवन कल्याण येथे 2 हजार, 400 मेगावॅट आणि सिरसाळा येथे 1 हजार, 250 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121