५० जेसीबी आणि ५० डंपर! अहमदाबादच्या इतिहासातील सर्वात मोठी तोडक कारवाई

बांगलादेशींची २००० हून अधिक बेकायदेशीर घरे जमिनदोस्त

    30-Apr-2025
Total Views |

Huge demolition in Ahmedabad

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Huge Demolition in Ahmedabad News) 
गुजरात सरकारने अहमदाबादच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी तोडक कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे. चांडोला तालब परिसरात वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींची २००० हून अधिक बेकायदेशीर घरे पाडण्यात आली आहेत. ही कारवाई आणखी दोन दिवस सुरू राहील. गृह विभागाच्या आदेशानुसार सोमवारी रात्री उशिरा मोठ्या संख्येने पोलिस दल चांडोळा तलाव परिसरात पोहोचले, त्यानंतर सदर कारवाईस सुरुवात झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा चांडोला तलाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्वप्रथम या भागातील बांगलादेशींच्या घरांमधील वीज कनेक्शन कापण्यात आले. त्यानंतर अहमदाबाद पोलीस आयुक्तांच्या निदर्शनाखाली या भागातून बांगलादेशींना हाकलण्यात आले. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत गांधीनगर येथे झालेल्या बैठकीत चांदोला तलाव परिसरातील ऐतिहासिक बांधकाम पाडण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मध्यरात्री १२ वाजता चांडोला येथे ५० जेसीबी आणि ५० डंपर उभे होते.

अहमदाबादच्या या ऐतिहासिक मोहिमेत २००० हून अधिक पोलिस, एसआरपीच्या १५ तुकड्या, महानगरपालिकेचे १८०० कर्मचारी, ७४ जेसीबी, २०० ट्रक, २० इलेक्ट्रिशियन टीम, १० वैद्यकीय टीम, १५ अग्निशमन दलाच्या गाड्या सज्ज झाल्या होत्या. बांगलादेशींच्या २००० हून अधिक झोपड्या, ३ बेकायदेशीर रिसॉर्ट, बेकायदेशीर पार्किंग युनिट्स पाडण्यात आली. अशाप्रकारे, अंदाजे १ लाख चौरस मीटर जमीन मोकळी करण्यात आली आहे. या कारवाईत १५० हून अधिक बांगलादेशी आढळले असून २०० हून अधिक संशयितांची चौकशी सुरू आहे.

काँग्रेसची याचिका न्यायालयाने फेटाळली
काँग्रेसने या मोहिमेविरुद्ध संबंधित उच्च न्यायालयात याचिका दाखल केली व स्थगितीची मागणी केली. परंतु युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक करताना हर्ष संघवी यांनी ट्विट केले की, बेकायदेशीर बांगलादेशी आणि पाकिस्तानी लोकांना संरक्षण देण्याचा काँग्रेसचा अजेंडा अपयशी ठरला आहे.

देशाविरुद्ध रचले जाणारे कट थांबवण्यासाठी ही कारवाई
राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करत म्हटले की, देशाविरुद्ध रचले जाणारे कट थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी याच चांडोला परिसरातून अल कायदाच्या स्लीपर सेलच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. आज या कारवाईदरम्यान, दहशतवादी राहत असलेले ठिकाण देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत, चांडोला परिसरातून अनेक ड्रग्ज प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे ड्रग्ज कार्टेलचे अस्तित्व दिसून येते. ही सर्व ठिकाणे देखील पाडण्यात आली. चांडोला येथे वर्षानुवर्षे मोठ्या संख्येने बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत होते, ज्यांची बेकायदेशीर घरेही बुलडोझरने पाडण्यात आली. चांडोला परिसरात बनावट कागदपत्रे आणि मनी लाँड्रिंगचे अनेक गुन्हे घडले आहेत. बांगलादेशींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवलेल्या प्रकरणांमध्ये अहमदाबाद गुन्हे शाखा लवकरच एफआयआर दाखल करेल.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121