मुंबई पोलिस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियूक्ती!
30-Apr-2025
Total Views | 31
मुंबई : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवार, ३० एप्रिल रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, देवेन भारती यांना आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त आहेत.
देवेन भारती हे गुन्हे शाखेसह एटीएससारख्या महत्वाच्या विभागांमध्ये प्रमुख पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या दहशतवादी कारवाया उघड करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची कामावरील पकड आणि दांडगा अनुभव या सगळ्याचा मुंबई पोलिस विभागाला नक्कीच उपयोग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.