मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty spotted cat breeding centre). या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राजाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला दिले आहेत. (rusty spotted cat breeding centre)
दुर्मीळ वाघाटीच्या वाढीसाठी राष्ट्रीय उद्यान प्रशासन २०१३ सालापासून 'वाघाटी संवर्धन प्रजनन प्रकल्प' राबवत आहे. त्यासाठी सुरुवातीच्या काळात प्रजनन केंद्र हे व्याघ्र सफारीच्या आवारात तयार करण्यात आले होते. २०१३ ते २०१८ या काळात या केंद्रात एकूण ६ वाघाटी होत्या. प्रजनन होत नसल्याने २०१९ साली उद्यान प्रशासनाने मार्जार कुळातील प्राण्यांवर काम करणारे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ नेव्हिल बक यांना उद्यानात आमंत्रित केले होते. वाघाच्या अधिवासाच्या शेजारी वाघाटी प्रजनन केंद्र असल्याने त्यांचे प्रजनन होत नसल्याचे निरीक्षण बक यांनी नोंदवले होते. तसेच वाघापासून दूरवर हे केंद्र पिंजऱ्याच्या नव्या रचनेसह बांधण्याचा सल्ला त्यांनी उद्यान प्रशासनाला दिला होता. त्यानुसार प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन नवीन केंद्र उभे केले. दरम्यान २०१८ साली केंद्रातील सहा वाघाटींपैकी २ वाघाटींचा मृत्यू झाला आणि वाघाटीची तीन पिल्ले बाहेरुन आणण्यात आली. २०१९ साली केंद्रातील सात वाघाटीपैंकी चार वाघाटींचा मृत्यू झाला आणि वाघाटीचे एक पिल्लू बाहेरुन आणण्यात आले. त्यानंतर उर्वरित वाघाटींना नव्या प्रजनन केंद्रात दाखल करण्यात आले.
लाखो रुपये खर्च करुन तयार केलेल्या नव्या प्रजनन केंद्रात देखील अजूनही एकाही वाघाटीचा जन्म झालेला नाही. 'सीझेडए'च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाघाटी प्रजनन केंद्रातील वाघाटीच्या देखभालीसाठी एक जीवशास्त्रज्ञ आणि एका पशुवैद्यकीय सहाय्यकाची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. मात्र, या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची भरतीच उद्यान प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात झालेल्या वाघाटीच्या सात पिल्लांचा मृत्यूनंतर आणि तज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या अभावी भविष्यातही वाघाटीचे प्रजनन होण्याची आशा धूसर आहे.
चौकशीचे आदेश
दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांच्या मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवासा राव यांनी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वीच उद्यानाच्या नवनियुक्त संचालक आणि वनसंरक्षक अनिता पाटील या प्रकरणाचे गांर्भीय ओळखून या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीचे आदेश सहाय्यक वनसंरक्षकांना दिले आहेत.