मुंबई: ( parbhani UBT group & sharad pawar ) परभणी जिल्ह्यातील पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे, पाथरी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण कोल्हे, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बालाजी देसाई यांच्यासह उबाठा आणि शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवार, दि. २ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे, असे भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
उबाठा आणि शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांच्या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल आणि संपूर्ण जिल्हा लवकरच भाजपामय होईल असा विश्वास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केला. भाजमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये पूर्णा बाजार समितीचे उपसभापती नारायणराव पिसाळ, माजी उपसभापती लक्ष्मण बोबडे, संतराम ढोणे, रमेशराव काळबांडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ सोळके, पाथरी पंचायत समितीचे माजी सभापती माणिक घुंबरे, बालाजी डाखोरे यांचा समावेश आहे. यावेळी विविध सेवा सहकारी संस्थांच्या ६० अध्यक्षांनी, तर जिल्ह्यातील ४० सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला.