वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष
03-Apr-2025
Total Views | 29
नवी दिल्ली : वक्फ सुधारणा कायदा (Waqf Amendment Bill) २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही अमित शाह म्हणाले होते. यावरूनच आता एका मौलानाने वक्फ सुधारणा कायद्याविरोधात आवाज उठवला आहे. देशाचे पुन्हा विभाजन होईल. त्याचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मौलाना म्हणाले की, वक्फ कायद्यामुळे १९४७ सारखी परिस्थिती निर्माण होईल. ते जमियत उलेमाचे महानगर अध्यक्ष असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे नाव मुफ्ती अकबर काझमी आहे.
वक्फवर कायद्यावर बोलताना मौलाना कासमी म्हणाले की, जर आपल्याला हा देश पुन्हा सुंदर बनवायचा असेल तर कायदा मागे घेव्या लागणार आहे. असेही होईल जसे की मुस्लिम रस्त्यावर यायला मागे पुढे पाहणार नाहीत, १९४७ ची घटना पुन्हा घडेल. खाली देण्यात आलेल्या व्हिडिओत तुम्ही मौलानाचे ३८ सेकंदापासून ते २.३६ सेकंदादरम्यानचे फुटेज आपण आपल्या सोईने पाहू शकता.
मौलाना म्हणाले की कायद्याच्या निषेधार्थ मोडेन पण झुकणार नाहीत. मौलाना म्हणाले की, या कायद्यासाठी पिढ्यानपिढ्या लढले जातील. हे लक्षात घेण्यासारखे की मुस्लिमांनी १९४७ साली देशाची फाळणी झाली आणि त्यातून पाकिस्तान तयार झाला. आताही तसंच काहीसं होण्याची परिस्थिती असल्याचा समज मौलानीने केलेला आहे. यामुळे आता हिंदू संघटनांनी याचा विरोध केला आहे. यानंतर मौलानींनी कारवाईची मागणी केली.