वक्फ सुधारणा विधेयक मंजूर होताच वनवासी कल्याण आश्रमने सरकारचे मानले आभार
03-Apr-2025
Total Views | 23
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vanvasi Kalyan Ashram) बहुचर्चित असलेले वक्फ सुधारणा विधेयक २८८ मतांनी लोकसभेत मंजूर करण्यात आले. तब्बल १२ तासांहून अधिक काळ यावर चर्चा सुरु होती. वनवासी कल्याण आश्रमने याचे स्वागत केले असून जनजातींच्या जमिनी सुरक्षित ठेवल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत.
वनवासी कल्याण आश्रमाने संयुक्त संसदीय समितीसमोर आपले निवेदन ठेऊन जनजातींच्या जमिनी सुरक्षित ठेवण्याबाबत आपली भूमिका मांडली होती. त्यानुसार कल्याण आश्रमाच्या मागणीवरूनच जेपीसीने आपल्या अहवालात वक्फ विधेयकात जनजातींच्या जमिनींच्या संरक्षणासाठी तरतूद करण्याची शिफारस सरकारला केल्याचे स्पष्ट होते आहे.
आदिवासींची जमीन; संविधानाच्या पाचव्या आणि सहाव्या अनुसूचीतील आदिवासींच्या जमिनी वक्फच्या कक्षेबाहेर राहतील, अशी घोषणा विधी व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत करणे म्हणजे वनवासी कल्याण आश्रमाने गेल्या पंधरा दिवसांत केलेल्या अविरत प्रयत्नांचे फलितच आहे.