भारतावर अमेरिकेकडून आयातशुल्क लादणे भारतासाठी संकट नाही तर संधी
भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून २६ टक्के आयातशुल्क लादले जाणार
03-Apr-2025
Total Views | 31
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तुंवर आयातशुल्क लादण्याच्या निर्णयात अखेर भारताचा समावेश झाला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय वस्तुंवर २६ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे. भारताबरोबरच चीन, युरोपीय देश, युके या देशांवरही असेच आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे भारतातील अमेरिकेला होणारी निर्यात महाग होऊ शकते.
याबरोबरच अमेरिकेकडून हे स्पष्ट केले गेले आहे की ज्या देशांवर आयातशुल्क लादण्याचा निर्णय झाला आहे. त्या देशांकडून जर या आयातशुल्कवाढील प्रतिक्रिया दिली गेली नाही तर या आयातशुल्कात वाढ होणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत प्रतिक्रिया देताना भारतसुध्दा भारतात आयात होणाऱ्या अमेरिकी वस्तुंवर आयातशुल्क लादतो त्यामुळे भारतावरही आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या आयातशुल्कवाढीमुळे भारतातील प्रामुख्याने दागिने व्यापाराला झळ बसु शकते. यानंतर या आयातशुल्कवाढीमुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये वाहन निर्मिती, औषधे निर्मिती, इलेक्ट्रॉनिक वस्तु या क्षेत्रांचा समावेश होतो. त्यामुळे या क्षेत्रांतील भारतातील अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आले आहे.
अमेरिकेची आयातशुल्कवाढ हे संकट नव्हे तर संधी – भारत सरकार
भारतीय व्यापार मंत्रालयाने अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या आयातशुल्कवाढीच्या परिणामांचा अभ्यास करत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार भारतावर लादले गेलेले आयातशुल्क हे भारतासाठी संकट नाही तर संधी आहे. त्यातून भारताला अनेक नवीन रस्ते खुले होतील. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही यामुळे भारतीय व्यापारवर काही विपरित परिणाम होणार नाही. उलट अमेरिका हा २०२४ मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे. यामुळे भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश यामुळे द्विपक्षीय संबंधात बाधा येईल असे काम करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.