अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर काय म्हणाले मंत्री बावनकुळे?
03-Apr-2025
Total Views | 42
मुंबई : लोकसभेत बुधवार दि. २ एप्रिल रोजी वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. त्यानंतर दीर्घकाळ झालेल्या चर्चेनंतर अखेर हे विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. मात्र, उबाठा गटाने या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी यावर स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषदही घेतली. यावरूनच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले," असा टोला त्यांनी लगावला.
"संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रपरिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.