राज्य सरकारचा मोठा निर्णय! पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना ५० लाखांची मदत

    29-Apr-2025
Total Views | 21
 
Mahayuti
 
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार, २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात संजय लेले, दिलीप डिसले, कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
 
हे वाचलंत का? -  लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
 
मंगळवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यासोबत त्यांचे शिक्षण आणि रोजगाराकडेही राज्य सरकार लक्ष देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पहलगाम हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचादेखील मृत्यू झाला. दरम्यान, त्यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बांधकाम स्थळांवरील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी कार्यशाळा

बांधकाम स्थळांवरील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी कार्यशाळा

शहरी वायू प्रदूषणाला तोंड देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, क्रेडाई-एमसीएचआयने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या सहकार्याने बांधकाम स्थळांवरील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्षमता-निर्मिती कार्यशाळा आयोजित केली. मुंबईतील क्रेडाई-एमसीएचआय कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील साइट अभियंते, सुरक्षा अधिकारी, पर्यावरण व्यावसायिक आणि प्रकल्प व्यवस्थापकांना बांधकाम क्रियाकलापांची संबंधित प्रदूषण नियंत्रण उपायांवर व्यावहारिक प्रशिक्षण..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121