अमेरिकेत पाकिस्तान दूतावासाबाहेर हिंदूंची तीव्र निदर्शने

    29-Apr-2025
Total Views | 11

Protest Outside Pakistan Embassy in USA

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Protest Outside Pakistan Embassy)
जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी निरपराध हिंदूंची ज्याप्रकारे हत्या केली, त्याने जगभरात दहशतवादाविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांना कठोर शिक्षा देण्याची मागणी ठिकठिकाणाहून होत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या लोकांनीही दहशतवादाविरोधात संघटित होऊन शिकागो येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने केली.

हे वाचलंत का? : देशाच्या शत्रूंना मुळापासून नष्ट करणे हाच समस्येवरचा उपाय!

या निदर्शनात इलिनॉय, इंडियाना आणि विस्कॉन्सिन येथील ८०० हून अधिक लोक पाकिस्तानी दूतावासासमोर जमले होते. त्यांनी आंदोलन करून न्यायाची मागणी केली. यूएस इंडिया कम्युनिटी फाउंडेशन द्वारा आयोजित या आयोजनास २५ हून अधिक समुदाय संघटनांनी पाठिंबा दिला होता. यावेळी आंदोलकांनी हातात बॅनर घेतले होते, ज्यावर 'हिंदू लाइव्ह्स मॅटर, पाकिस्तान स्टॉप टेररिझम' असे लिहिले होते.

पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी
निदर्शनादरम्यान लोकांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. तसेच पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी हिंदू समाजाचे प्रमुख नेते डॉ. भरत बारई यांनी या दहशतवादी घटनेबद्दल शोक आणि संताप व्यक्त केला आणि सांगितले की, गुन्हेगारांना जबाबदार धरून पीडितांना न्याय मिळवून देण्याची आमची सर्व एकमताने मागणी आहे.
सुसंस्कृत समाजात दहशतवादाला स्थान नाही

निदर्शनादरम्यान विश्व हिंदू परिषद अमेरिकेचे महासचिव अमिताभ मित्तल म्हणाले की, सुसंस्कृत समाजात दहशतवादाला स्थान नाही. आम्ही येथे केवळ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसोबत एकजूट दाखवण्यासाठी नाही तर जम्मू-काश्मीरमधील अत्याचारित हिंदूंना न्याय मिळावा या मागणीसाठी आलो आहोत. आम्ही निरपराधांच्या हत्येला आणि अमानवी कृत्यांना परवानगी देऊ शकत नाही. आम्ही शांत बसणार नाही. याशिवाय, आम्ही जागतिक समुदाय आणि संयुक्त राष्ट्रांकडून पाकिस्तानला दहशतवादाला दिलेला पाठिंबा ओळखून त्याला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी करतो.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121