"व्यक्तीने कितीही मोठ्या पदावर असले तरी..."; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे वडे्ट्टीवारांना खडेबोल
29-Apr-2025
Total Views | 22
मुंबई : व्यक्तीने कितीही मोठ्या पदावर असले तरी असंवेदनशील बोलू नये. पण विजय वडेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि देशातील जनतेला दुखावणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना सुनावले आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "विजय वडेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि देशातील जनतेला दुखावणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अशा वक्तव्याची केवळ माफी मागून काहीही होणार नाही. बेजबाबदार वक्तव्य करायचे, समाजाचे मन दुखवायचे, वस्तुस्थितीचा अभ्यास न करता माध्यमांची जागा घेण्यासाठी बोलायचे, असे सगळे सुरु असते. पण आपल्या एका बोलण्याने समाजावर काय परिणाम होईल? या घटनेत जे परिवार उध्वस्त झाले त्यांच्यावर काय परिणाम होईल? तपास यंत्रणांवर काय परिणाम होतील?"
"व्यक्तीने कितीही मोठ्या पदावर असले तरी असंवेदनशील बोलू नये. वडेट्टीवार यांनी ज्यापद्धतीने असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्य केले यातून काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा आणि देशाबद्दलच्या भावना दिसतात. त्यामुळे पुढच्या काळात जनता त्यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही, असे मला वाटते. मोदीजींना पाकिस्तानला रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. ते पाकिस्तानला योग्य ती शिक्षा देतील. संपूर्ण देश मोदीजींसोबत त्यांच्यासोबत उभा आहे. पण अशा परिस्थितीतही राजकारण जात नाही. वडेट्टीवारांसारखे लोक यातही राजकारण करतात," अशी टीकाही त्यांनी केली.