बँकेच्या एटीएममध्ये १००-२०० रुपयांच्या नोटा मिळत नाहीत? आता चिंता मिटणार!

    29-Apr-2025
Total Views | 8
बँकेच्या एटीएममध्ये १००-२०० रुपयांच्या नोटा मिळत नाहीत? आता चिंता मिटणार!
 
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएममधून मिळणाऱ्या नोटांच्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच वेळा ग्राहकांना एटीएममधून केवळ ५०० रुपयांच्या नोटाच मिळतात. ज्यामुळे दररोजचे व्यवहार करताना अडचणी येतात. ही गोष्ट लक्षात घेता आरबीआयने सर्व बँकांना एक सूचना दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या एका परिपत्रकानुसार, सर्व बँकांनी आपल्या एटीएममध्ये १०० रुपये आणि २०० रुपयांच्या नोटांचा पुरेसा साठा ठेवावा आणि ग्राहकांना या लहान किमतीच्या नोटा सहजपणे मिळतील, याची काळजी घ्यावी. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील दुकानदार, रिक्षाचालक, आणि इतर सामान्य व्यवहार करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय देशभरातील रोख व्यवहार अधिक सोपा व्हावा या दृष्टीने घेतला आहे. बँकांनी आपल्या एटीएम मशिन्सचा आढावा घेऊन, लवकरात लवकर ही सुधारणा लागू करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. नवीन परिपत्रकामुळे ग्राहकांना आता लहान किमतीच्या नोटांसाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही आणि त्यांचा वेळ वाचेल. या निर्णयाचे स्वागत सामान्य नागरिकांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर होत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121