'पी.एस.आय. अर्जुन'मधील प्रमोशनल साँगला ‘पुष्पा’फेम नकाश अजीज यांचा आवाज, सुपरस्टार अंकुश चौधरी सुद्धा बनला गायक!

    28-Apr-2025   
Total Views | 10


the promotional song in pushpa fame nakash aziz has lent his voice to pushpa fame, superstar ankush chaudhary has also become a singer


मुंबई : सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' सध्या चांगलाच चर्चेत असून पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने राडा घातला असतानाच अंकुश प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आला आहे. 'पी.एस.आय. अर्जुन'मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज असून या प्रमोशनल साँगच्या निमित्ताने स्टाईल आयकॉन अंकुशचा हा नवीन स्वॅगस्टर अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या गाण्याच्या एनर्जेटीक, कॅची बिट्समुळे हे गाणे सर्वत्र ट्रेंडिंग ठरत आहे. बॉलिवूडलचे प्रसिद्ध गायक ज्यांनी ‘पुष्पा टायटल साँग’, ‘जबरा फॅन’, ‘क्यूटीपाय’, ‘ स्लो मोशन’ यांसारखे हिट गाण्यांचे गायक नकाश अजीज व अंकुश चौधरीच्या जबरदस्त आवाजातील या गाण्याला अनिरुद्ध निमकर यांनी कमाल संगीत दिले असून जयदीप मराठे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

संगीतकार अनिरुद्ध निमकर म्हणतात, “‘धतड ततड धिंगाणा’ या गाण्याची चाल आणि कॅची संगीतामुळे ते अत्यंत धमाकेदार बनले आहे. या गाण्यातील काही संवाद गाण्याला आणखी आकर्षक बनवतात. आम्हाला वाटले, की जर अंकुश दादांच्या आवाजात हे गाणे सादर झाले तर ते अधिक जबरदस्त होईल आणि प्रेक्षकांना देखील अधिक भावेल. मात्र जेव्हा आम्ही त्यांना विचारले, तेव्हा ते यासाठी तयार नव्हते. त्यांच्या मते, नकाश अजीजसारख्या उत्तम गायकाचा आवाज असताना माझ्या आवाजामुळे गाण्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र माझा आणि नकाशचा हट्ट होता की हे गाणे अंकुश दादांच्या आवाजातच व्हायला हवे. त्यामुळेच आज या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.”

निर्माते विक्रम शंकर म्हणतात, “ पी.एस.आय. अर्जुन या चित्रपटातील अंकुशच्या रुबाबदार, दमदार भूमिकेला शोभेल, असे हे प्रमोशनल साँग त्याच्याच आवाजात प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. हे गाणे बॉलिवूडला जबरदस्त गाणी देणाऱ्या नकाश अजीज यांनी गायले असून त्यात सुपरस्टार अंकुश चौधरी यांच्या रॅपने अधिक रंगत आणली आहे. संगीतप्रेमींना हे गाणे आवडतेय, यातच आनंद आहे.

व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित 'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा
पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121