मुंबई : मराठी चित्रपट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी! होय केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज प्रस्तुत झापुक झुपूक हा चित्रपट मंगळवारी म्हणजेच २९एप्रिल रोजी, प्रेक्षकांना अवघ्या ₹९९ मध्ये थिएटरमध्ये पाहता येणार आहे. निर्मात्यांनी सूरज च्या प्रेक्षकांसाठी खास ऑफर जाहीर केल्यामुळे आता प्रेक्षक मोठ्या संख्येने या सुवर्ण संधीचा लाभ घेतील हे नक्कीच!
सर्वाधिक चर्चेत असलेला हा कौटुंबीक मनोरंजन देणारा मराठी चित्रपट २५ एप्रिलपासून थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे यांच्या सारख्या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयामुळे 'झापुक झुपूक' सर्वत्र लोकप्रिय ठरत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सूरजला अभिनय कौशल्यासाठी त्याच्या फॅन्स कडून प्रशंसा मिळत आहे.
चित्रपटातील एका पेक्षा एक सरस गाणी म्युझिक चार्टबस्टर वर टॉपला वाजत आहेत. सध्या प्रत्येक क्लब, पब आणि पार्ट्यांमध्ये झापूक झुपूक शीर्षक गीत तर लग्न समारंभात वाजीव दादा हे हळदीच गाणं धुमाकुळ घालत आहे तर प्रेमीयुगलांमध्ये प्रितीची घंटा वाजतेय.
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे , केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" या चित्रपटातील संवाद, कथा आणि विनोदी प्रसंगांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत आहे. सोशल मीडियावरही 'झापुक झुपूक' ट्रेंडमध्ये असून प्रेक्षकांनी या सिनेमाचे कौतुक करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर मग, हसा, धमाल करा आणि 'झापुक झुपूक' चा सिनेमागृहांत जाऊन फक्त ₹९९ रुपयांमध्ये आनंद घ्या!
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.