मुंबई (Bangladeshi hawkers): विक्रोळी परिसरात विक्रोळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ बांगलादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या सर्वांच्या आधारकार्डवर दि. १ जानेवारी हीच जन्मतारीख नमूद करण्यात आली असून पत्ता साहेबगंज, झारखंडचा दर्शवण्यात आला आहे. विक्रोळी येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विनायक कामथ, युवराज मोरे, गणेश शेट्टी आणि केतकी सांगळे यांनी मार्केटमध्ये रविवार, दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भेट दिली. यावेळी, त्यांना डझनभर संशयित फेरीवाले आढळले. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला असता, या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले की, “ही बाब अतिशय गंभीर आहे. विदेशी नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहात असून त्यांच्या हालचाली तपासण्याची गरज आहे.”
मशिदीचे भोंगे उतरवले
रमाबाईनगर घाटकोपर मशिदीचे भोंगे उतरवण्यात आले. रविवारी दुपारी १२ वाजता रमाबाई नगर घाटकोपर येथे जाऊन पोलिसांना माहिती दिली. २४ तासांत अनधिकृत भोंगे निघाले पाहिजेत, असा आग्रह केला. पोलिसांनी मशिदीच्या विश्वस्तांना भोंगे काढायला सांगितले. त्यानंतर भोंगे उतरवले.
पोलिसांकडून चौकशी सुरू
प्रत्येक व्यक्तीच्या आधारकार्डवर एकसारखीच जन्मतारीख असणे धोकादायक आहे. या आधारकार्डबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या फेरीवाल्यांनी कोणत्या मार्गाने भारतात प्रवेश केला, त्यांच्यासोबत आणखी कोणी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. परदेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींची नावे आणि जन्मतारीख