मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Siddharamaiya Controversial Statement) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देश एकवटला असून दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारही याबाबत कारवाई करत आहे. मात्र काँग्रेसशासित कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यातून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसतेय. त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पाकिस्तानी मीडियाचे पोस्टर हिरो बनल्याचे दिसून येत आहे.
सिद्धरामय्या यांना पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानविरोधातील लष्करी कारवाईबद्दल विचारले असता ते म्हणाले, आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. पाकिस्तानशी युद्ध करण्याची गरजच काय? उलट भारत सरकारला आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत त्यांना पाकिस्तान रत्न म्हटले आहे. देशावर युद्धाचा धोका असताना अशा संवेदनशील परिस्थितीत ते पाकिस्तानच्या बाहुल्यांसारखे वागत आहेत, असे ते म्हणाले. सिद्धरामय्या यांची पाकिस्तानी मीडियात चर्चा होत असलेली क्लिप शेअर करताना भाजप नेत्याने खिल्ली उडवली की, आता ते पाकिस्तानला गेले तर तिथे त्यांचे शाही स्वागत केले जाईल. हे शक्य आहे की पाकिस्तान सिद्धरामय्या यांना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान, निशान-ए-पाकिस्तान प्रदान करेल. असे लोक ही देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
सिद्धरामय्या मुस्लिम मतांमुळेच मुख्यमंत्री
दरम्यान, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सिद्धरामय्या यांच्या तुष्टीकरणाच्या वक्तव्याचे सत्य उघड केले आणि सिद्धरामय्या हे केवळ मुस्लिम मतांमुळेच मुख्यमंत्री झाल्याचा दावा केला. त्यामुळे पाकिस्तानला वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आला असून भारताला युद्ध न करण्याचा सल्ला देत आहेत.