‘महारेरा’कडून ६८४.५६ कोटींच्या वसुलीला वेग

- सहा जिल्ह्यांमध्ये १२ महसूलवसुली अधिकार्‍यांची नियुक्ती

    28-Apr-2025
Total Views |
 
Recovery of Rs 684.56 crore from MahaRERA
 
मुंबई: ( Recovery of Rs 684.56 crore from MahaRERA ) ‘महारेरा’च्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांना तक्रारदाराला व्याजाची तसेच घराची रक्कम परत न करणार्‍या विकासकांविरोधात वसुली आदेश (रिकव्हरी वॉरंट) जारी करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून थकित वसुली वेगात होत नसून आजही तब्बल६८९.९८  कोटी रुपयांची थकित वसुली आहे. आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुण्यातील थकित वसुलीला वेग देण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासाठी या सहा जिल्ह्यांमध्ये १२ समर्पित महसूलवसुली अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.
 
या सहा जिल्ह्यांत ६८९.९८कोटी रुपयांपैकी ६८४.५६कोटी रुपये थकित वसुली आहे. महसूल विभागाने 12 समर्पित महसूलवसुली अधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे संबंधित तक्रारदार ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘महारेरा’कडे मोठ्या संख्येने खासगी विकासकांविरोधात तक्रारी दाखल होत आहेत.
 
या तक्रारींनुसार ग्राहकांची फसवणूक झाल्याचे, ‘रेरा’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर तक्रारदाराने मालमत्तेसाठी विकासकाकडे भरलेली रक्कम व्याजासकट परत करण्याचे आदेश ‘महारेरा’कडून दिले जातात. मात्र या आदेशाचे पालन न करणार्‍या विकसकांविरोधात ‘महारेरा’कडून वसुली आदेश (रिकव्हरी वॉरंट) जारी करण्यात येतात.
 
त्यानुसार विकासकाची मालमत्ता जप्त करून तिच्या लिलावातून येणारी निश्चित रक्कम संबंधित तक्रारदाराला देण्यात येते. ही प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.
 
मुंबई उपनगराकडे सर्वाधिक थकबाकी
 
आतापर्यंत ‘महारेरा’कडून एकूण ९१२.११ कोटी रुपयांचे वसुली आदेश देण्यात आले आहेत. त्यांपैकी आतापर्यंत केवळ २२२.१३  कोटी रुपयांची वसुली झाली असून ग्राहकांना त्यांचा परतावा करण्यात आला आहे. पण आजही तब्बल६८९.९८ कोटी रुपयांची थकित वसुली असून मोठ्या संख्येने ग्राहक भरपाईची, परताव्याची वाट पाहात आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे या सहा जिल्ह्यांमध्ये ही थकबाकी आहे. त्यातही मुंबई उपनगराकडे सर्वाधिक३२५.४३ कोटी रुपयांची थकित वसुली आहे. त्यापाठोपाठ पुण्याकडे १७७.३७ कोटींची वसुली थकित आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

"पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये"; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे...

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

( operation sindoor with evidence ) आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121