‘रॅंचो स्कूल’ म्हणजेच द्रुक पद्मा कार्पो स्कूलला अखेर CBSE मान्यता मिळाली. या शाळेची स्थापना २० वर्षापूर्वी झाली होती. २००९ मध्ये आलेल्या ३ इडियट्स मुळे देसभर प्रसिद्ध झालेली ही शाळा.
शाळेचे मुख्याध्यापक मिंगुर अँग्मो यांनी सांगितले आम्हाला की आम्हाला अनेक वर्षाच्या प्रयत्नांनतर आम्हाला ही मान्यता मिळाली आहे. इतके दिवस आम्ही जम्मू आणि काश्मीर राज्य शालेय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवत होतो. या मान्यतेमुळे जम्मू आणि काश्मीर मधील विद्यार्थी CBSE बोर्डाप्रमाणे शिकू शकतील.
शाळा स्थापनेपासूनच स्थानिक गरजांना अनुसरून शिक्षण देण्यावर भर देत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक जीवनशैलीचा समतोल साधत, विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण देण्याचा येथे प्रयत्न केला जातो.
CBSE मान्यता मिळाल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळेल, तसेच त्यांचे उच्च शिक्षणासाठीचे दरवाजे अधिक खुले होतील. हा निर्णय लडाखमधील शिक्षणाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल मानला जात आहे.