नालासोपाऱ्यात जिहाद्यांकडून पाकिस्तानी झेंड्याचे समर्थन! तीन जणांना अटक
28-Apr-2025
Total Views | 55
मुंबई : नालसोपारा येथे काही लोकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा लावला असताना काही कट्टरपंथीयांनी त्याला विरोध केला. दरम्यान, आता पाकिस्तानच्या झेंड्याचे संरक्षण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शनिवार, २६ एप्रिल रोजी नालासोपारा येथील ऑरेंज हाइटस, यशवंत कॉम्प्लेक्सजवळ पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर लावत या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, काही कट्टरपंथी युवक तिथे आले आणि हा आमच्या धर्माचा झेंडा आहे असे म्हणत विरोध करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे दोन गटांत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता पाकिस्तानच्या झेंड्याचे रक्षण करणाऱ्या तीन युवकांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. उस्मान गणी, तौशिद आझाद शेख आणि अदनान अफसर शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.