उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी दिली सेवा हक्काची शपथ
28-Apr-2025
Total Views | 13
मुंबई, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी २८ एप्रिल २०२५ रोजी सेवा हक्क दिनी सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवा हक्काबाबत शपथ दिली. या प्रसंगी गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने २८ एप्रिल २०१५ रोजी “महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५” हा कायदा अंमलात आणला. या अधिनियमातील कलम ४ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियत कालमर्यादेत जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे उत्तरदायित्व निश्चित केले आहे. या कायद्याने अस्तित्वात आलेल्या राज्य सेवा हक्क आयोगाचे ब्रीदवाक्य “आपली सेवा आमचे कर्तव्य” हे आहे.
लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याच्या दशकपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाने २८ एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. सेवा हक्का दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विजय सिंघल यांच्या उपस्थितीत सिडकोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवा हक्क शपथेचे सामूहिक वाचन केले.