संशयित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्याची मोहीम

    27-Apr-2025
Total Views | 6

Terrorists houses destroyed 
 
नवी दिल्ली (Terrorists houses destroyed): पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयित स्थानिक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतर, लष्कराने शोपियान आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच ठेवत आहेत.
 
सुरक्षा दलांनी पुलवामा, शोपियान आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत. दहशतवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे. शोपियानमधील छोटीपोरा येथील ‘लष्कर-ए-तोयबा’चा सक्रिय दहशतवादी कमांडर शाहिद अहमद कुट्टे याचे घर सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केले. शाहिद गेल्या तीन ते चार वर्षांपासून सक्रिय आहे आणि अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता.
 
शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी रात्री सुरक्षा दलांनी कुलगाममधील क्विमोह येथील दहशतवादी झाकीर घनीचे घर उद्ध्वस्त केले. झाकीर २०२३ साली लष्करात सामील झाला होता. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी एकूण पाच दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामामध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’चा दहशतवादी एहसान उल हकचे घर जमीनदोस्त करण्यात आले.
 
याआधी सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. ज्यामध्ये अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील त्राल येथील गोरी भागात एका दहशतवाद्याचे घर बॉम्बने उडवून देण्यात आले, तर दुसर्या संशयिताचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले.
आतापर्यंत उद्ध्वस्त घरे
आदिल गोजरी (बिजबेहरा)
आसिफ शेख (त्राल)
अहसान शेख (पुलवामा)
शाहिद कुट्टे (शोपियान)
झाकीर घनी (कुलगाम)
हरिस अहमद (पुलवामा)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121