त्यांना शौर्य पुरस्कार द्या – खासदार सूप्रिया सुळेंची मागणी
27-Apr-2025
Total Views | 71
मुंबई : २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील सर्वात घातक घटना. ही घटना पहलगामजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये घडली. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. एकूण २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले. दशतवाद्यानी आधी धर्म विचारला नंतर गोळ्या झाडूण ठार मारले. हल्ल्यातील बहुतेक बळी हिंदू होते.
अहवालात असे दिसून आले आहे की हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी बळींची नावे आणि धर्म विचारले. काही पर्यटकांनी सांगितले की त्यांना इस्लामिक कलिमा म्हणण्यास सांगण्यात आले होते, जेणेकरून अतिरेकी त्यांना धर्मानुसार वेगळे करू शकतील.
ह्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कूटूंबीयानी हिंमतीने संपूर्ण प्रसंगांचा सामना केला. अश्या परिस्थित त्यांच्य़ा कूटूंबाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी त्यांना १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्य़ा निमित्ताने ‘नागरी शौर्य’ पूरस्कार देऊण गौरवण्यात यावे. यासोबच कूटूंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. सूळेनी CM फडणवीस यांना पत्र लिहीले.