माजी सभापतीसह १६ सरपंच, ६ नगरसेवकांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

- हिंगणा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार

    26-Apr-2025
Total Views |
 
including 16 sarpanches, 6 corporators, including former chairman join BJP hingna vidhansabha
 
नागपूर: ( including 16 sarpanches, 6 corporators, including former chairman join BJP hingna vidhansabha)
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य उज्जवला बोढारे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
 
या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित्त हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी सर्वांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते. आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
 
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार गटाचे अत्यंत प्रामाणिक आणि ऊर्जावान नेत्या, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारे, १८ सरपंच, ९० ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आज आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. नागपूर जिल्ह्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे.
 
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघात आणि नागपूर जिल्ह्यात भाजपला होईल, कारण काही मत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश बंग यांना मिळाली होती. त्यामुळे तेथील मोठ्या प्रमाणातील मते ही आता भाजपला मिळतील. या प्रवेशामुळे हिंगणा मतदार संघात पक्षाची ताकद आणखी वाढेल असेही बावनकुळे म्हणाले.
 
यावेळी माजी आमदार राजू पारवे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान, आदर्श पटले, बिपीन गिरडे, विवेक इंदुरकर, विनायक खराबे, अश्विनी जिचकार, भास्कर खाडे, अमित कदम यावेळी उपस्थित होते.