पहलगाम हल्ला :अमेरिकेची मोठी घोषणा

    26-Apr-2025
Total Views |
 
पहलगाम हल्ला :अमेरिकेची मोठी घोषणा
 
 
मुंबई , २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले, तर २० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे.
 
अमेरिकेने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या नेत्या तुलसी गॅबार्ड यांनी ट्विट केले."आम्ही भारतासोबत उभे आहोत," असे त्या म्हणाल्या."आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयां बरोबर माझ्या प्रार्थना आहेत," असेही त्यांनी नमूद केले. गॅबार्ड पुढे म्हणाल्या, "आम्ही तुमच्यासोबत आहोत.""हल्ल्याच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी भारताला संपूर्ण पाठिंबा देऊ," असे त्यांनी सांगितले.
देशभरात संतापाचे वातावरण आहे.सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

 आहेत.दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग आला आहे. पोलिस आणि लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे. अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे.जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे.
हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला आहे.या हल्ल्याने देशभर भितीचे वातवरण आहे.