श्रीनगर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत ६ दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली आहेत. यात आदिल गोजरी (बिजबेहरा), आसिफ शेख (त्राल), अहसान शेख (पुलवामा), शाहिद कुट्टे (शोपियां), जाकिर गनी (कुलगाम), हारिस अहमद (पुलवामा) या दहशतवाद्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील बिजबेहाराचा रहिवासी आदिल ठोकर हा २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला असून तिथे त्याने दहशतवादी प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून तो देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच आसिफ शेख हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा स्थानिक कमांडर आहे.