'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' साठी मुंबईत स्वतंत्र प्राधिकरण

मुंबई शहरातील परिवहन सेवेचे सुसूत्रीकरण

    26-Apr-2025
Total Views | 13


मुंबई,
मुंबईत नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (युनि फाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.या प्राधिकरणाच्या कायद्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी (UMTA) बिल, २०२५'च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.

राज्यातील महानगरांच्या शहरी क्षेत्रातील वाहतूक प्रकल्पांचे नियोजन, नियमन आणि बजेट तयार करण्याच्या पद्धतीमध्ये यूएमटीएची स्थापना एक परिवर्तनकारी पाऊल असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बऱ्याच कालावधीपासून शहरी वाहतूक व्यवस्था अनेक वेगेवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, मेट्रो आणि रेल्वे यांनी स्वतंत्रपणे आपापल्या व्यवस्था स्थापित केलेल्या आहेत. अनेक यंत्रणांच्या या बहुविविधतेमुळे अनेकदा जबाबदाऱ्यांमध्ये समन्वय, आव्हाने आणि प्रकल्प अंमलबजावणीत विलंब होतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये विविध यंत्रणांमार्फत कार्यरत असलेल्या परिवहन सेवा एकत्रित व सुसूत्र करण्यासाठी हे प्राधिकरण उपयुक्त ठरणार आहे. त्यात 'मुख्य कार्यकारी अधिकारी' स्वतंत्र पद असावे तसेच महापौर, मनपा आयुक्त यांच्याही त्यात समावेश असावा. या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध सेवा एकाच भाड्यात उपलब्ध होतील आणि नियोजन एकसंध राहील. हे करताना राज्य व केंद्र सरकारच्या नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शहरातील सुरू असलेल्या प्रकल्पांना वेग देणे, एकच नियामक यंत्रणा तयार करणे आणि 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' सुनिश्चित करणे या प्राधिकरणाच्या कामाचे केंद्रबिंदू असतील. प्रत्यक्ष अंमलबजावणी महापालिकेकडे राहील, तर नियोजन आणि सल्लागार भूमिका हे प्राधिकरण पार पाडेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121