हिंगणा विधानसभेत शरद पवार गटाला दणका! अनेक बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

    26-Apr-2025
Total Views | 41
 
BJP
 
नागपूर : हिंगणा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा दणका बसला आहे. शनिवार, २६ एप्रिल रोजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या उज्ज्वला बोढारे यांच्यासह १६ सरपंच, पंचायत समितीचे ३ सदस्य, १ माजी सभापती, हिंगणा नगर पंचायत मधील ५ नगरसेवक, खरेदी विक्री व कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सेवा सहकारी संचालक मंडळाचे एकूण १५ संचालक, हिंगणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व प्रमुख आजी-माजी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
 
हे वाचलंत का? -  जम्मू काश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त!
 
हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्तावत हा पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान, त्यांच्या पक्षप्रवेशाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपचा मोठा विजय होईल. उज्वला बोडारे या संघटनेचा कार्यकर्त्या असून त्यांचा उपयोग संघटनेला होईल आणि भाजपचा विचार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, अशी भावना यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121