संशयित दहशतवाद्यांची घरे उध्वस्त करण्याची मोहिम

    26-Apr-2025
Total Views | 11

संशयित दहशतवाद्यांची घरे उध्वस्त करण्याची मोहिम


नवी दिल्ली, पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयित स्थानिक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतर, लष्कराने शोपियान आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच ठेवत आहेत. सुरक्षा दलांनी पुलवामा, शोपियान आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत. दहशतवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे. शोपियानमधील छोटीपोरा येथील लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय दहशतवादी कमांडर शाहिद अहमद कुट्टे याचे घर सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केले. शाहिद गेल्या तीन ते चार वर्षांपासून सक्रिय आहे आणि अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता.
 
शुक्रवारी रात्री सुरक्षा दलांनी कुलगाममधील क्विमोह येथील दहशतवादी झाकीर घनीचे घर उद्ध्वस्त केले. झाकीर २०२३ मध्ये लष्करात सामील झाला होता. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी एकूण पाच दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी एहसान उल हकचे घर जमीनदोस्त करण्यात आले. याआधी सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. ज्यामध्ये अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील त्राल येथील गोरी भागात एका दहशतवाद्याचे घर बॉम्बने उडवून देण्यात आले, तर दुसऱ्या संशयिताचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले.

आतापर्यंत उध्वस्त घरे
आदिल गोजरी (बिजबेहरा)
आसिफ शेख (त्राल)
अहसान शेख (पुलवामा)
 
शाहिद कुट्टे (शोपियां)
 
झाकीर घनी (कुलगाम)
 
हरिस अहमद (पुलवामा)


अग्रलेख
जरुर वाचा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सवानिमित्त युवा मोर्चाचा रक्तदान उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सवानिमित्त युवा मोर्चाचा रक्तदान उपक्रम

दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ०२ जून रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष “रक्तदान उपक्रम” सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांसा..

मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५; माध्यमविश्वातील हिरक महोत्सव!

मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५; माध्यमविश्वातील हिरक महोत्सव!

प्रसारमाध्यमे ही समाजाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. ती फक्त माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब, आणि दिशादर्शक आहेत. योग्य व जबाबदारीने त्यांचा वापर केला गेला, तर ती लोकशाहीच्या हितासाठी मोलाची ठरू शकतात. माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्णहातांचं योगदान लाभलं आहे. पडद्यावर आणि पडद्यामागं राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्णमोलाची आहे. माध्यमांना वेगळा आयाम देण्यात या व्यक्तींचा खूप मोलाचा वाटा आहे. या परीसरूपी हातांचं कौतुक होणं आज गरजेचं आहे. माध्यमांच्या आजच्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121