मुंबई : पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या का याबाबतचे सत्य मला माहिती नाही, असे विधान शरद पवारांनी केले आहे. यावर तुमची नेमकी ईच्छा काय आहे? असा सवाल भाजपकडून शरद पवारांना करण्यात आला आहे.
"शरद पवारांनी कधीतरी तुष्टीकरणाच्या राजकारणापलीकडे जाऊन, जनतेला फक्त मतदाता म्हणून न पाहता संवेदनशीलता दाखवावी. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात जे निष्पाप हिंदू मारले गेलेत, त्यातील अनेकांचे अजून अस्थी विसर्जन सुरुच आहे. मात्र शरद पवारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ल्यातील मृतकांच्या कुटुंबियांच्या बोलण्यावर शंका उपस्थित करण्याचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे."
"वास्तविक पाहता मृतकांच्या कुटुंबियांनीच आतंकवाद्यांनी मारण्यापूर्वी नाव, धर्म विचारला, अशी माहिती दिली आहे. परंतू, शरद पवारांनी व्होट जिहादसाठी या दुःखद विषयात राजकारण सुरु केले आहे. शरद पवार तुम्ही म्हणताय महिलांना हात लावले नाही, फक्त पुरुषांना हात लावले, तुमची नेमकी ईच्छा काय आहे?" असा सवाल भाजपच्या वतीने शरद पवारांना करण्यात आला आहे.