मुंबई, २५ एप्रिल: समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. पण यामागील वैज्ञानिक कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. समुद्राच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मीठ असते.
सुर्याच्या ऊष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. पाणी आकाशात जाते पण मीठ तळाशीच रहाते. त्यामुळे दिवसेंदिवस समुद्रातील क्षारांचे प्रमाण वाढते आहे. हेच मुख्य कारण आहे की समुद्राचे पाणी दिवसेंदिवस अधिक खारट होत चालले आहे.
जेव्हा आपण समुद्राचे पाणी पितो, तेव्हा शरीराला त्या मिठाचे प्रमाण संतुलित करण्यासाठी जास्त पाणी वापरावे लागते. परिणामी, शरीर अधिक डिहायड्रेट होऊ शकते.
संपूर्ण जगात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असताना, समुद्राच्या पाण्याचा उपयोग थोड्याच प्रमाणात केला जातो, तोही प्रक्रिया करूनच. म्हणूनच, समुद्राच्या पाण्यात मीठ जास्त असल्यामुळे ते थेट पिण्यास योग्य नाही.
समुद्राच्या पाण्याचा वापर असाच मानवी आयुष्यात सुरू राहिला तर त्याचे परिणाम अधिक गंभीर होतील
मेंदूचे नुकसान: तीव्र डिहायड्रेशनमुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
झटके: इलेक्ट्रोलाइट असंतुलनामुळे झटके येऊ शकतात.
मृत्यू: शेवटी, अनियंत्रित डिहायड्रेशनमुळे अवयव निकामी होऊ शकतात आणि मृत्यू होऊ शकतो.