राजेंद्र पवार महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी

    25-Apr-2025
Total Views | 21
राजेंद्र पवार महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी


मुंबई, महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

महावितरणमधील सेवेचा ३६ वर्षांचा अनुभव असणारे नवनियुक्त संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार हे मूळचे भऊर (ता. देवळा, जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यानंतर १९८९ मध्ये तत्कालिन म. रा. विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वाशी (ता. पेण) येथे रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीवर त्यांनी सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदी काम केले आहे. सन २०११ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या काळात त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल, कल्याण येथे काम केले आहे. तसेच अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर व पुणे येथे काम केले आहे. तर गेल्या सव्वादोन वर्षांपासून पवार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी याआधीच्या सेवेत लोकाभिमुख प्रशासन, ग्राहकसेवा आणि मानव संसाधन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे परिमंडलामध्ये मुख्य अभियंता म्हणून त्यांनी महसूलवाढ, नवीन वीजजोडण्या, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. सोबतच कर्मचारी प्रशिक्षण व कार्यशाळा, कर्मचारी प्रोत्साहनपर विविध उपक्रम, कर्मचारीपाल्यांची अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया आदींना मोठा वेग दिला. त्यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण व विविध उपक्रमांमुळे पुणे लघु प्रशिक्षण केंद्राला सलग तीन वर्ष राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यापूर्वी पवार यांनी स्वतः ‘ऑन फिल्ड’ राहून मुंबईचा महापूर, ‘तौक्ते’, ‘निसर्ग’ चक्रीवादळ, ‘कोरोना’ आदी संकटांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नेतृत्व केले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121