हैदराबाद: ( Olectra introduces GFRP rebar ) ओलेक्ट्रा ने एमईआईएल बजेट मीट दरम्यान जीएफआरपी रीबार (ग्लास फायबर प्रबलित पॉलिमर रीबार) लॉन्च केला आहे. कॉक्रिटला मजबूत करण्याच्या वाटचालीत हे मोठे तांत्रिक यश मानले जात आहे. या नवीन उत्पादनाचे उद्घाटन एमईआईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री पी. व्ही. कृष्ण रेड्डी यांच्या हस्ते झाले.
ओलेक्ट्रा सीएमडी श्री के. व्ही. प्रदीप म्हणाले, "हे उत्पादन बांधकाम उद्योगात क्रांती घडवेल. हे खर्चाची बचत, कमी देखभाल व जास्त काळ टिकणारे ठरेल. याच्या उपयोगामुळे बांधकाम प्रकल्पांसाठी नवी मानके तयार होतील."
जीएफआरपी रीबारची वैशिष्ट्ये
• स्टीलपेक्षा दोन पट जास्त ताकदवान: 950-1100 MPa
• स्टीलपेक्षा चार पट हलके: हाताळणे व वाहतुकीस सोपे
• गंजरोधक, चुंबकीय नसलेले व जलरोधक: दीर्घकाळ टिकणारे
• पर्यावरणपूरक: स्टीलसाठी उत्तम पर्याय
उपयोगक्षेत्रे
जीएफआरपी रीबारचा उपयोग समुद्री प्रकल्प, रस्ते , पुल डेक, औद्योगिक बांधकामे यांसारख्या ठिकाणी केला जाऊ शकतो. हे स्टीलच्या तुलनेत अधिक टिकाऊ व विश्वासार्ह आहे.
ओलेक्ट्रा बद्दल
ओलेक्ट्रा, MEIL समूहाचा भाग आहे. कंपनीची 2000 साली स्थापन झाली. भारतामध्ये इलेक्ट्रिक बसेस सुरू करणारी ही अग्रणी कंपनी आहे. आता रीबार उत्पादनामूळे ओलेक्ट्रा पायाभूत सुविधा क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहे