मालेगावमध्ये ईडीची छापेमारी! बनावट जन्म दाखला प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
25-Apr-2025
Total Views | 24
नाशिक : बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी नाशिक येथील मालेगावमध्ये शुक्रवार, २५ एप्रिल रोजी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. पहाटेपासूनच मालेगावमध्ये ईडीचे पथक दाखल झाले असून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
मालेगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला दिल्याचा प्रकार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर याबाबत विविध तक्रारीही दाखल करण्यात आल्या. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाईही सुरु केली होती.
दरम्यान, आता आता ईडीनेही याची गंभीर दखल घेत कारवाई सुरु केली आहे. ईडीकडून मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. बेकायदा जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी ईडीने मालेगावमधील एकूण ९ ठिकाणी छापा छापा टाकला आहे.