महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

- राष्ट्रवादीचा उपक्रम; महाराष्ट्रातील पाच विभागात जाणार रथयात्रा

    25-Apr-2025
Total Views | 7
Maharashtra Gaurav Rath Yatra inaugurated by Sunil Tatkare

मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, या पाच विभागातून मुंबईत होणार्‍या महाराष्ट्र महोत्सवासाठी महाराष्ट्रातील हुतात्मा स्मारक, मंदिरे, दर्गा, गुरुद्वारा, तिर्थस्थळे या ठिकाणची पवित्र माती, याशिवाय नद्यांचे जल आणि गडकिल्ल्यांची माती आणली जाणार आहे. त्यासाठीच्या रथयात्रेचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

मराठवाडा विभागातील हिंगोली,परभणी, नांदेड, लातूर, धाराशीव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, विदर्भ विभागातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ,अकोला, वर्धा, कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, पश्चिम विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उत्तर विभागातील जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, नाशिक, या जिल्ह्यातील महामानवांचे, महापुरूषांचे वास्तव लाभलेल्या, महान व्यक्तींच्या कार्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नद्यांचे पाणी आणि माती या रथावरील मंगलकलशामध्ये गोळा करण्यात येणार आहे. हे मंगलकलश १ मे पूर्वी मुंबईत आणले जाणार आहेत.

या महाराष्ट्र गौरव रथयात्रेच्या शुभारंभाला माजी मंत्री संजय बनसोडे, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टच्या सदस्या मनिषा तुपे, मुंबई युवक अध्यक्ष सुनिल गिरी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे सदस्य सुदर्शन सांगळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121