मुंबई : (KEM Hospital) मुंबईतील केईएम रुग्णालयात ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ (MJPJAY) आणि ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’(AB-PMJAY)अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा नोंदणी कक्षाचे उद्घाटन मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी करण्यात आले. या कक्षामार्फत रुग्णांना शासकीय योजनेंतर्गत अधिक दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे.
केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, डॉ. रोशन वाडे व डॉ. तुषार राठोड (अस्थिव्यंगतज्ज्ञ विभाग) आणि ‘सी. एस. क्रिएटिव्ह सोल्यूशन्स’ (C. S. Creative Solutions) च्या प्रोप्रायटर तनुजा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या नेतृत्वाखाली आणि ‘सी. एस. क्रिएटिव्ह सोल्यूशन्स’ या संस्थेच्या सहकार्याने या कक्षाचे लोकार्पण करण्यात आले.
हा कक्ष वातानुकूलित आणि अद्ययावत तांत्रिक सुविधांनी परिपूर्ण आहे. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयासारखी अद्ययावत सुविधा सार्वजनिक रुग्णालयातून मिळणार आहे. ‘सी. एस. क्रिएटिव्ह सोल्यूशन्स’ ही संस्था गेल्या १२ वर्षांपासून देशभरात शासकीय आरोग्य योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी कार्यान्वित असून २०१८ पासून मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना‘ आणि ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ अशा अनेक योजना रुग्णालयात राबवण्याचे कार्य करत आहे. या संस्थेने या योजनांतर्गत लाखो रुग्णांची यशस्वी नोंदणी करून त्यांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी पुरेपूर सहकार्य केले आहे. रुग्णालयात येणार्या प्रत्येक लाभार्थी रुग्णाला ते योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळवून देत आहेत. त्यांचा क्लेम सक्सेस रेशो १०० टक्के आहे.
"केईएम रुग्णालयात दरवर्षी लाखो रुग्ण उपचारासाठी येतात. उपचारांसाठी येणार्या रुग्णांना शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रभावी व्यवस्थापन गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेने ‘छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्यूशन्स’ या अनुभवी एजन्सीला नियुक्त केले आहे. गेल्या आठ वर्षांतील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ आणि ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’अंतर्गत लोकार्पण झालेल्या या कक्षामुळे रुग्णांची नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेगाने होईल. आम्ही रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत आणि आता हा नवीन कक्ष म्हणजे उच्च दर्जाची निःशुल्क आरोग्यसेवा पुरवण्याच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\