किरीट सोमय्यांना धमकी देणाऱ्या युसूफ अन्सारीला अखेर बेड्या!

    24-Apr-2025
Total Views | 50
 
Kirit Somaiyya
 
मुंबई : अनधिकृत मशिदी आणि बेकायदेशीर भोंगे लाऊडस्पीकर विरुद्ध कारवाईची मागणी केल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकी देणाऱ्या युसूफ अन्सारी या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
हे वाचलंत का? -  मनसेचे दहशतवादाला पर्यटनाने उत्तर! काश्मीर पर्यटनाबाबत घेतला मोठा निर्णय
 
किरीट सोमय्या यांनी मशीदींवरील अनधिकृत भोंग्यासंदर्भात तक्रार दाखल केल्याने त्यांना धमकी देण्यात आली होती. युसूफ उमर अन्सारी नामक व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत किरीट सोमय्यांच्या घरी येऊन आंदोलन करण्याची तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, ईशान्य मुंबईचे भाजपचे अध्यक्ष दिपक दळवी यांनी मुलूंड पोलिस आयुक्तांना पत्र लिहित युसूफ उमर अन्सारीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आता युसूफ अन्सारीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121