जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमान!
महाराष्ट्रातील १८३ पर्यटक मुंबईत परतणार
24-Apr-2025
Total Views | 7
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील अनेक नागरिक तिथे अडकले आहेत. दरम्यान, त्यांना मुंबईत परत आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष विमानाची व्यवस्था केली असून त्यांना सुखरूप परत आणण्यात येणार आहे.
काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर गुरुवार, २४ एप्रिल रोजी २ विशेष विमाने मुंबईत येणार आहेत.
इंडिगोचे विमान ८३ पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने १०० पर्यटकांना परत आणले जाईल. महाराष्ट्रातील एकूण १८३ पर्यटक मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. दरम्यान, या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.