भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने निदर्शने

    24-Apr-2025
Total Views | 4


BJP Regional Office Mumbai
 
मुंबई (BJP Regional Office Mumbai): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
 
यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वासिम खान, उपाध्यक्ष सलमान खान, मासुक सिद्दीकी, हुसेन खान, अलताफ शेख, आदिल शेख, जहांगीर खान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘आतंकवाद मुर्दाबाद’ अशा घोषणांचे फलक हातात घेऊन हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मोदी सरकारच्या समर्थनार्थ ‘अमितभाई आगे बढो हम तुम्हारे साथ है’ या आशयाचे फलकही हातात घेण्यात आले होते.
 
  
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121