क्रूझ टर्मिनलच्या विश्वात

    23-Apr-2025
Total Views | 8
 
iconic Mumbai International Cruise Terminal
 
भारताचा सागरी दरवाजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई बंदर येथे, देशातील सर्वांत मोठे आणि आयकॉनिक क्रूझ टर्मिनल सोमवार, दि. 21 रोजी संपूर्ण जगासाठी खुले झाले. हे भारतातील सर्वांत मोठे क्रूझ टर्मिनल आहे. यामध्ये एकाचवेळी दोन मोठी जहाजे उभी राहू शकतात. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच खुल्या झालेल्या जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक पोर्ट मियामी येथील क्रूझ टर्मिनलचा आढावा घेऊया.
 
जागतिक पातळीवर क्रूझ क्षेत्रातील सर्वपरिचित असलेल्या भूमध्य सागरीय शिपिंग कंपनी अर्थात ‘एमएससी’ कंपनीने, जगातील सर्वांत मोठे ‘एमएससी मियामी क्रूझ टर्मिनल’ खुले केले. अमेरिकेतील फ्लोरिडातील पोर्ट मियामी येथे हे टर्मिनल आहे. 4 लाख, 92 हजार, 678 वर्ग फूट क्षेत्रफळ असलेल्या या टर्मिनलची क्षमता, दररोज 36 हजार प्रवाशांची आहे. तसेच इथे प्रवाशांची ओळख पडताळणी, डिजिटलपद्धतीने बायोमेट्रिक स्वरूपात करून, पाहुण्यांना विविध आधुनिक सुविधा देण्यात येतात. या भव्य क्रूझ टर्मिनलवर एकाच वेळी तीन क्रूझ जहाजे सहज उभी राहतात.
 
हे नवीन टर्मिनल क्रूझर्सना संपूर्ण बायोमेट्रिक प्रवास प्रदान करणारे, पहिले टर्मिनल आहे. प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा या उद्देषाने, या टर्मिनलचा विकास करण्यात आला आहे. नावीन पद्धतीनुसार बायोमेट्रिक प्रवासाचा पर्याय निवडलेल्या प्रवाशांना, त्यांचा पासपोर्ट स्कॅन करण्यास आणि बायोमेट्रिक फेस पॅडपैकी एका कॅमेर्‍याचा वापर करण्यात येतो. त्यानंतर प्रवास प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी 20 सुरक्षा लेन आहेत. या टर्मिनलवर 42 सामान तपासणीच्या मशीन आहेत. इथे प्रवाशांना बायोमेट्रिक ई-गेटमधूनच प्रवेश मिळतो. दिला जातो. ही क्रूझच्या दिशेने जाण्याच्या प्रक्रियेतील शेवटची पायरी असते, त्यानंतर क्रूझर्स जहाजसफारीचा आनंद मुक्तपणे घेतात.
 
नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी टर्मिनलच्या डिझाईनमध्ये, ठिकठिकाणी आकर्षकरित्या झडपा तयार करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या दृष्टीने प्रत्यक्ष जहाजावर चढण्यापूर्वी विश्रांतीसाठी प्रशस्त अशी प्रतीक्षागृहे आहेत. जसे जहाजात चढणे सोपे आहे, त्याचप्रमाणे, उतरणेदेखील सुलभ आहे. प्रगत सामान हाताळणी प्रणालीही इथे उभारण्यात आली आहे.
 
या नवीन क्रूझ टर्मिनलचा सर्वांत आकर्षक भाग म्हणजे कलाप्रदर्शन. ही कलाकृती टर्मिनलवरदेखील विविध ठिकाणी प्रदर्शित केली आहे. या नावीन्यपूर्ण सार्वजनिक कलाकृतींची निर्मिती ‘पोर्टमियामी’, ‘मियामी-डेड काऊंटी डिपार्टमेंट ऑफ कल्चरल अफेयर्स’, ‘आर्ट इन पब्लिक प्लेसेस प्रोग्राम’ आणि ‘एमएससी’ यांच्या परस्पर सहकार्यातून झाली आहे. ‘मियामी-डेड काऊंटी आर्ट इन पब्लिक प्लेसेस’ हा ‘मियामी-डेड काऊंटी डिपार्टमेंट ऑफ कल्चरल अफेयर्स’चा एक उपक्रम आहे.
 
या टर्मिनलमध्ये दोन जहाजांचे बर्थ तयार असून, तिसरा बर्थ पूर्ण करण्याची जबाबदारी ‘मियामी-डेड काऊंटी’कडेच असून, 2028 पर्यंत ते पूर्ण होईल. यामुळे टर्मिनल तीन जहाजांना सामावून घेण्यास सक्षम असेल. ‘एमएससी’ क्रूझेसने सांगितले की, 2025 मध्ये नवीन टर्मिनलवरून, एकूण चार जहाजे प्रवास करतील. यात लक्झरी ब्रॅण्ड ’एक्सप्लोरा’ प्रवासाची जहाजे असतील. हे टर्मिनल मियामीच्या आर्किटेक्टोनिकाद्वारे डिझाईन केलेले आणि फिनकँटेरी इन्फ्रास्ट्रक्चरने बांधले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 450 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च झाला.
 
या समारंभात अमेरिकेतील इटलीच्या राजदूत मारियांजेला झप्पिया, ‘एमएससी’ क्रूझेसचे कार्यकारी अध्यक्ष पियरफ्रान्सेस्को वेगो, ‘एमएससी’ क्रूझेस यूएसएचे अध्यक्ष रिक सासो, फिनकँटेरीचे सीईओ पियरोबर्टो फोल्गिएरो, ‘मियामी-डेड काऊंटी’च्या महापौर डॅनिएला लेव्हिन कावा, मियामीचे महापौर फ्रान्सिस सुआरेझ आणि पोर्टमियामीचे संचालक हायडी वेब उपस्थित होते. या चार मजली विस्तीर्ण आणि प्रभावी जगातील सर्वांत मोठ्या क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन, दि. 5 एप्रिल 2025 रोजी झाले.
 
या समारंभाचे सूत्रसंचालक सासो यांनी, इटली आणि अमेरिका आणि सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमधील सहकार्यावर प्रकाश टाकला. राजदूत झप्पिया यांनी टर्मिनलला दोन इटालियन उद्योजक, ‘एमएससी’ आणि फिनकॅन्टेरी यांचे असाधारण काम आणि कुशल अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि सौंदर्याचे प्रतीक म्हणून संबोधले. फिनकॅन्टेरी यांनी फोल्गिएरोसाठी ही इमारत क्षमता आणि दृढनिश्चयाचे प्रतिनिधित्व करत असतानाच, स्वागत आणि सन्मानाचे प्रतीक म्हणले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121