अस्वस्थ वाटत असल्याने ओळख विचारूनच हल्ला!, वाड्रा यांनी केली दहशतवाद्यांची पाठराखण

    23-Apr-2025
Total Views | 182

Terrorists
 
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये भयानक दहशतवादी (Terrorists) घटना घडल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई तसेच उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, देशात हिंदू-मुस्लिम असं सर्वकाही सुरू आहे. दहशतवाद्यांना अस्वस्थ वाटत आहे आणि म्हणूनच दहशतवादी त्यांची ओळख विचारपूस करत हत्या करत आहेत. त्यांनी सांगितले की, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा एक संदेश असून देशात मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांना मोठी समस्या निर्माण होईल.
 
रॉबर्ट वाड्रा यांनी मंगळवारी झालेल्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये आतंकी हल्ल्यात मोठं तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. वाड्रा यांनी एका प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मला खूप वाईट वाटलं आणि या दहशतवादी घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. वाड्रा यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, सरकार हिंदुत्वावर भाष्य करते. त्यामुळे अल्पसंख्यांक लोक हे त्रस्त आणि समस्याग्रस्त असल्याचे सांगत आहेत. वाड्रा यांच्या म्हणण्यांनुसार, देशात पाहतोय की, हे सरकार केवळ हिंदूंबाबत बोलत आहे आणि अल्पसंख्यांकांना त्रास होतो.
 
 
 
त्यांनी पहलगाममध्ये आतंकी हल्ल्यामागे नेमकं कोण आहे, यावरही त्यांनी भाष्य केले. वाड्रा म्हणाले की, जर दहशतवादी जर केवळ हिंदूंना मारत आहेत, तर यामुळे देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण झालेला आहे. कारण आपल्या देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये विभाजन होत आहे.
 
वाड्रा यांनी सांगितले की, अशा घटनेमुळे दहशतवादी संघनांनी सांगितले की, हिंदू-मुस्लिमांसाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहे. ते म्हणाले की, ओळख पटवून मारणे ही केवळ नरेंद्र मोदींचा संदेश असल्याचा बेताल वक्तव्य वाड्रा यांनी केले आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार, या संघटनांना असे वाटते की हिंदू सर्व मुस्लिमांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. ओळख पटवून एखाद्याला मारहाण करणे हा पंतप्रधानांचा संदेश आहे. कारण मुस्लिम हे स्वत: कमजोर असल्याचे सांगत आहेत.
 
यावेळी वाड्राने सरकारकडे मागणी केली की, संबंधित घटनास्थळी अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, असे वाड्रा म्हणाले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121