काश्मिरात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष स्थापन

    23-Apr-2025
Total Views |

Terrorists attack tourists at tourist spot in Pahalgam kashmir
 
मुंबई: ( Terrorists attack tourists at tourist spot in Pahalgam kashmir ) पहलगाम येथील पर्यटनस्थळावर दहशतवाद्यांकडून पर्यटकावर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
यामध्ये महाराष्ट्रातील अजून काही पर्यटक असण्याची शक्यता आहे. जर या हल्ल्याच्या ठिकाणी मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा ओळखीतील कोणी नातेवाईक वा व्यक्ती असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आव्हान मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मुंबईकरांसाठी करण्यात आले आहे.
 
मदतीसाठी संर्पक क्रमांक -
 
जिल्हा नियंत्रण कक्ष - मुंबई शहर
 
दुरध्वनी क्रमांक : ०२२-२२६६४२३२ (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता)
संपर्क क्रमांक : ८६५७१०६२७३
संपर्क क्रमांक : ७२७६४४६४३२
 
पर्यटकांसाठी आपल्कालीन मदत कक्ष-
 
पर्यटकांच्या मदतीसाठी श्रीनगर येथील जिल्हा मुख्यालय, डीसी कार्यालय येथे २४x७ पर्यटकांसाठी मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
 
०१९४-२४८३६५१
 
०१९४- २४५७५४३
 
वॉट्सएप क्रमांक -
 
७७८०८०५१४४
 
७७८०९३८३९७