काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष कक्ष

    23-Apr-2025
Total Views | 9
Special room for Pahalgam tourists stranded in Kashmir

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष कक्ष

मुंबई, पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.
 
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबईत आणण्यात आले. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.
काश्मीरमधील संपर्क क्रमांक
१) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543
2) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397
दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती
- पहलगाम येथे पर्यटकांवरील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील बाधित नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (मंत्रालय नियंत्रण कक्ष) येथील कक्षात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली.
- मंत्रालय नियंत्रण कक्षात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे व्यवस्थापक विशेषकर सुर्यवंशी व कक्ष अधिकारी नितीन मसळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी मदतीकरिता मंत्रालय नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०२७९९०/२२७९४२२९ व भ्रमणध्वनी क्रमांक ९३२१५८७१४३ (वॉट्सअप क्रमांक) तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक (टोल फ्री १०७०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन खडके यांनी केले आहे. 


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121