'कलमा' पठण करून प्राध्यापक भट्टाचार्य यांनी वाचवले आपले प्राण, घटनेचा घटनाक्रम समोर
23-Apr-2025
Total Views | 17
श्रीनगर (Kalma) : काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात एकूण २० जणांवर गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात हिंदूचा समावेश आहे. मंगळवारी २२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी हा हल्ला करण्यात आला होता. यावेळी काहींनी कलमा पठण करत आपले प्राण वाचवले आहेत. आसाममधील एका प्राध्यापकाने कलमा वाचून कशापद्धीने आपले प्राण वाचवले याची आठवण करून दिली आहे.
दहशतवादी गैर मुस्लिमांना मारण्यासाठी एकत्रित येत असताना, सिलचरमधील आसाम विद्यापीठातील देबाशिश भट्टाचार्य यांनी इस्लामी श्लोक कलमाचे पठण केले आणि दहशतवाद्यांना आपण मुस्लिम असल्याचे भासवले आणि तिथून कसेबसे निसटले.
सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यात, दहशतवाद्यांनी लोकांना कलमा म्हणण्यास सांगून आणि खतना करण्यासाठी तपासणी करून अहिंदूंना वेगळे करण्यात आले.
समोर मृत्यू उभा असताना केवळ दैव बलवत्तर म्हणून जीव वाचलेल्या एका प्रोफेसरने या भ्याड हल्ल्यावेळी त्यांच्यासोबत काय घडले, हे सांगितले. देबाशिष भट्टाचार्य हे आसाम विद्यापीठात बंगाली विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. प्रोफेसर भट्टाचार्य हे आपल्या कुटुंबासोबत जम्मू काश्मीर येथे फिरायला… pic.twitter.com/xQRlnb9A1p
इस्लाममध्ये कलमा हे एक श्लोक आहे आणि ती एक श्रद्धा आहे आणि ती अल्लाहप्रती निष्ठा म्हणून कार्यरत असते. ते म्हणू शकत नव्हते की त्यांना गैर-मुस्लिम मानले जात असे आणि त्यांना गोळ्या घातल्या जात आहे. त्याचप्रमाणे मुस्लिमांमध्ये खतना ही परंपरा आहे. ज्यांचा खतना केला नव्हता त्यांना गैर मु्स्लिम मानले जात असे आणि त्यांना गोळ्या घालून मारण्यात येत होते.
भट्टाचार्य यांनी एका प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना आणि कलमासंबंधित सांगितले की, ते एका झाडाखाली आराम करत होते. त्यावेळी त्यांनी आजूबाजूला असणाऱ्यांना कलमाचे पठण करण्यास सांगितले. आरामानंतर उठून पाहिल्यास सर्वजण कलमा पठण करत होते.
मी माझ्या कुटुंबासोबत एका झाडाखाली आराम करत होते तेव्हा माझ्या भोवताली असणाऱ्या सर्वांना कलमा म्हणताना ऐकले. त्यावेळी मी कलमा म्हणण्यास सुरूवात केली. तेवढ्यात दहशतवाद्याने माझ्याजवळ येत माझ्या बाजूला असणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडली होती. त्यानंतर माझ्याकडे तो वाकला आणि क्या कर रहे हो? असा प्रश्न त्याने केला. मी आणखी जोराने कलमा श्लोक म्हणण्यास सुरूवात केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला, असा आसाम विद्यापीठातील बंगाली विभागाचे सहयोगी प्राध्यापक भट्टाचार्य यांनी घटनाक्रम सांगितला.