हिंदू असल्यानेच अतुल मोने यांची हत्या

नातेवाईकांनी केली कठोर कारवाईची मागणी-दहशतवादास धर्म नसल्याचे सांगणाऱ्या ब्रिगेडची मात्र दातखीळ

    23-Apr-2025
Total Views |

Atul Mone was murdered because he was a Hindu.


हिंदू असल्यानेच अतुल मोने यांची हत्या

नातेवाईकांनी केली कठोर कारवाईची मागणी-दहशतवादास धर्म नसल्याचे सांगणाऱ्या ब्रिगेडची मात्र दातखीळ

नवी दिल्ली, दशतवाद्यांनी प्रथम हिंदू आहात का असे विचारले आणि त्यानंतर अतुल मोने यांना गोळ्या घातल्या, अशी धक्कादायक माहिती मृत मोने यांचे नातेवाईक राहुल अकुल यांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने तसे वृत्त दिले आहे.
पहलगाममध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर मंगळवारी हल्ला करून २७ जणांचे बळी घेतले आहे. मात्र, देशातील ‘दहशतवादास धर्म नसतो’ ब्रिगेडने या दहशतवादी हल्ल्याचा धर्माशी काही संबंध नसल्याचे तुणतुणे वाजविण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, आता या हल्ल्यात बळी गेलेल्या हिंदूंच्या नातेवाईकांनीच सत्य उघडकीस आणले आहे.

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अतुल मोने हेदेखील मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांचे नातेवाईक राहुल अकुल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हल्ल्याविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, आपण अतुल मोने यांच्या पत्नीशी बोललो आणि घटनेची माहिती घेतली. त्यानुसार, दहशतवाद्यांनी प्रथम “तुम्ही हिंदू आहात का” असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर “होय” असे दिल्यानंतर लक्ष्य करून तीन पुरुषांना ठार मारण्यात आले. त्यामध्ये अतुल मोने यांचाही समावेश होता. या हल्ल्यामुळे सर्वांनाच भयाचा तीव्र धक्का बसल्याचेही अकुल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.