जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर २ दहशतवादी ढेर, पाकिस्तानातून भारतात करत होते अवैध घुसखोरी

    23-Apr-2025
Total Views | 14
Jammu and Kashmir
 
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सेनाने २ दहशतवाद्यांना हाणून पाडण्यात आले आहे. बारामूल्लाहतील उरी नाल परिसरातील असणारी सीमा पार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्या दोघांनाही चकमकीत ठार मारण्यात आले. एनकाउंटर झाल्यानंतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
 
ही कारवाई काश्मीरमध्ये तैनात करण्यात असलेल्या लष्कराच्या चिनार कॉर्प्सने केली. चिनार कॉर्प्सने एक्स वर पोस्ट शेअर केली. २३ एप्रिल २०२५ मध्ये २-३ आतंकवादींना उरी नाला, बारामूल्लाहतील सरजीवन परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सैन्याने त्यांना आव्हान दिले आणि थांबवले, त्यानंतर चकमकला सुरूवात करण्यात आली आहे.
 
यानंतर, चिनार कॉर्प्सने चकमकीबाबत आणखी एक अपडेट दिली. ते म्हणाले की, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दोन दहशतवाद्यांना मारहाण करण्यात आली. सुरू असणाऱ्या या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाने घुसखोरी करणाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारे होती, गोळा बारूद आणि युद्धासारखे इतर अन्य सामान वसूल करण्यात आले आहेत.
 
 
 
चिनार कॉर्प्सने सांगितले की, सध्या ऑपरेशन सुरू आहे. ज्यात दोन दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरात सुरक्षा दलाचे अभियान सुरू आहे. संबंधित जागा पहलगामपासून २०० किमीपासून दूर आहे. याचसोबत सांगण्यात येत आगे की, त्यांच्यासोबत इतर आतंकवादी होते ते पाकिस्तानातील विविध भागात लपले होते.
 
उन्हाळा सुरू होताच जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांचे प्रमाण वाढले आहे. एका अहवालाने दिलेल्या माहितीनुसार, वर्तमानकाळात काश्मीरदरम्यान, ५६ दहशतवादी सक्रिय आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दल संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सतर्कता आहे. पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह हे देखील काश्मीरमध्ये होते. या हल्ल्यात एकूण २८ जणांना मारण्यात आले आणि १२ जण घायाळ झाले आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121