नऊ वर्षांच्या चिमुकलीवर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया

मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकार वापरून केली मदत

    22-Apr-2025
Total Views | 13




Chief Minister
 
मुंबई:(Chief Minister's Relief Fundमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कक्षामार्फत नाशिकमधील नऊ वर्षांच्या चिमुकलीवर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. यासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
कक्षामार्फत नऊ महिने ते दोन वर्षे वय असलेल्या बालकांनाच या उपचारासाठी निधी दिला जातो. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने, तसेच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कक्षाच्या माध्यमातून रुग्णावर यशस्वीरित्या उपचार झाले आहेत. रुग्णाचे वडील हे कंत्राटी पद्धतीने एका खासगी कंपनीत कामाला आहेत. आई गृहिणी असून मोठी बहीण पदवीधर आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून उपचारासाठी लागणारी रक्कम ही रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी फार मोठी होती.

कक्षाने केलेल्या मदतीमुळे आज माझ्या मुलीवर उपचार होऊ शकले. ती ऐकू शकेल, बोलू शकेल, या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कक्षाचे मनस्वी आभार, अशा शब्दांत रुग्णाच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला मदत देण्यासाठी, त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्यासाठी कक्ष प्रयत्नशील आहे. काही तांत्रिक बाबी आल्यास त्या शिथिल केल्या जातील आणि रुग्णाच्या उपचारांना प्राधान्य देण्यात येईल,“ अशा भावना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केल्या.

 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121